अकॅडमीचे वर्णन
गुणवत्तेचे मापदंड म्हणून ओळखली जाणारी शालेय जीवनातील पहिली स्पर्धात्मक परीक्षा म्हणून शिष्यवृत्ती परीक्षेकडे पाहिले जाते विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेचे खरी कसोटी म्हणून या परीक्षेला अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झाले आहे. प्रतिभावान विद्यार्थ्यांचा शोध घेऊन भविष्यातील राष्ट्राच्या जडणघडणीसाठी कुशाग्र बुद्धिमत्तेची व संशोधक वृत्तीची फळीउभारण्यासाठी या परीक्षेची सुरुवात 2015 पासून पाचवी व आठवी या वर्षासाठी झाली . यातून नवोदय यांनी यम यम एस या परीक्षांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात शिष्यवृत्ती देऊन प्रतिभावान विद्यार्थ्यांना आर्थिक सहाय्य दिले जाते. भविष्यातील सर्व स्पर्धा परीक्षांचा पाया भक्कम करण्यासाठी तसेच विद्यार्थ्यांच्या अष्टपैलू व्यक्तित्वाला चालना देण्यासाठी ही परीक्षा भरीव योगदान देते .
विद्यार्थ्यांनी मिळवलेल्या ज्ञानाचा उपयोग व्यवहारात कसा करावा. ज्ञानाचे उपयोजन करून विद्यार्थ्यात निरीक्षणातून अचूक अंदाज बांधण्याची किमया साधली जाते परीक्षेची तयारी करताना विद्यार्थ्यांनी घेतलेले कष्ट त्यांना त्यांच्या जीवनात खूप मोठा आत्मविश्वास देऊन जातात भविष्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन तयार होण्यासाठी या परीक्षेची गरज आहे असा दृष्टिकोन की जो विद्यार्थ्यांना प्रत्येक क्षेत्रात यश मिळवून देईल. पण या स्पर्धा परीक्षेचे मार्गदर्शन निवडीत असताना आपण तितकेच सजग असणे आवश्यक आहे. केवळ पुस्तकांच्या साहाय्याने उत्तरापर्यंत येणाऱ्या अनेक मार्गदर्शक आपणाला भेटतील पण होणाऱ्या मूलभूत संकल्पना व प्रश्नांचा सखोल पर्यंत ज्ञान देऊन त्यांचे उपयोजन घडवणारे अचूक मार्गदर्शन तितकेच गरजेचे आहे. आपल्या पाल्यासाठी आज निवडलेला मार्ग हाच त्याला उद्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी मार्गदर्शक ठरेल योग्य निवड आपल्याला यशाच्या उंच शिखरावर पोहोचण्यासाठी योग्य मार्गदर्शक म्हणजे गुरुकुल अकॅडमी.
आमची वैशिष्ट्ये
- निवासाची उत्तम सोय मुला - मुलींसाठी स्वतंत्र राहण्याची व्यवस्था.
- अनुभवी शिक्षक मार्गदर्शक व सुसज्ज ग्रंथालय व संगणक कक्ष.
- बौद्धिक विकासाबरोबरच संस्कारक्षम शिक्षण व प्रत्येक विद्यार्थ्याकडे विशेष लक्ष.
- हस्ताक्षर , वक्तृत्व व इंग्रजी विषयासाठी विशेष.
- विद्यार्थ्याच्या व्यक्तिगत विकासासाठी विशेष लक्ष.
- निवड चाचणीतून विद्यार्थ्यांची निवड.
- भरपूर प्रश्नपत्रिका सराव
- स्वयं अध्ययन व स्वावलंबन आवर भर.
- स्वादिष्ट व रुचकर घरगुती पद्धतीचे फोटो भोजन व्यवस्था.
- पिण्यासाठी शुद्ध पाणी .
- सीसीटीव्ही कॅमेरा द्वारे देखरेख २४ तास सेक्युरिटी.
- भव्य इमारत व खेळासाठी मैदान.